राष्ट्रीय (25/08/2019) 
अनिल कपूर, रवीना टंडन आणि अमिषा पटेल ‘इंडो इस्रायल सांस्कृतिक महोत्सव-२०१९’मध्ये धमाल करणार

मुंबई : भारतातील सुप्रसिद्ध इव्हेंट ऑर्गनायजर ‘युनिव्हर्सल इव्हेंट्स’ या संस्थेने ‘रिसर्च मीडिया ग्रुपच्या बरोबर इस्रायलमध्ये १५ ते १७ ऑक्टोबर २०१९ रोजी ‘इंडो-इस्रायल सांस्कृतिक महोत्सव-२०१९’ आयोजित केला आहे. या महोत्सवाचे पोस्टर अंधेरी (पश्चिम) येथील कंट्री क्लब येथे 24 ऑगस्टला एका भव्य पत्रकार परिषदेत बॉलीवूड आणि टॉलीवूड अभिनेत्री पायल घोष हिच्या हस्ते लाँच केले. यावेळी पायल म्हणाली कीअशा महोत्सवांमुळे देशातील संस्कृतीकला आणि पर्यटनाला चालना मिळेल. ती पुढे म्हणाली की,इस्रायलमध्ये होणाऱ्या या महोत्सवाला अनिल कपूररवीना टंडन आणि अमिषा पटेल यांच्यासहीत बॉलीवूड आणि दक्षिणेतील मोठे कलाकार उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ‘युनिव्हर्सल इव्हेंट्सचे संचालक . मोसेज कुर्मारिसर्च मीडिया ग्रुपचे अध्यक्ष चैतन्य जंगाआरएमजीचे कार्यकारी संचालक पीवीएस वर्माआरएमजीचे सीईओ हरी लीला प्रसादअभिनेत्री पायल घोषप्रियंका रेवडीसमायरा खान आदी मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

       ‘युनिव्हर्सल इव्हेंट्सचे संचालक मोसेज कुर्मा यांनी म्हटले की,"अनिल कपूर जी यांनी महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे मान्य केले याचा आम्हाला आनंद होतोय. अनिल कपूर जी उपस्थित राहिल्यामुळे कला आणि संस्कृती यांना निश्चितच मोठे प्रोत्साहन मिळेल आणि त्यासोबतच इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायात एक नवा जोश भरण्याचे काम होईल. आम्ही हा महोत्सव मोठ्या स्तरावर करत आहोत. यामुळे दोन्ही देशांमधील बंधुभाव वाढेल आणि त्यामुळे पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल."

          ‘रिसर्च मीडिया ग्रुपचे अध्यक्ष चैतन्य जंगा यांनी या प्रसंगी म्हटले की,"इंडो-इस्रायल सांस्कृतिक संबंधाच्या इतिहासात हे पहिलेच आणि सर्वात मोठे आयोजन केले जात आहे. या महोत्सवामुळे भारतातील कलासंस्कृती आणि पर्यटनाला एक नवे व्यासपीठ मिळेल.

 

Copyright @ 2019.